service photo

कृषी विभाग / पंचायत समिती माहिती


१) योजनाचा परिचय

राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत व्यवस्थापन कार्यक्रम (NBMMP) हा भारत सरकारचा ग्रामीण भागासाठी राबविण्यात येणारा स्वच्छ ऊर्जा व सेंद्रिय शेतीला चालना देणारा महत्त्वाचा उपक्रम आहे.
या योजनेअंतर्गत ग्रामीण घरांमध्ये गृहसंलग्न बायोगॅस प्लांट उभारण्यासाठी अनुदान दिले जाते तसेच उत्पादित बायोगॅसचे इंधन म्हणून व जैविक स्लरीचे सेंद्रिय खत म्हणून वापर वाढवला जातो.




२) योजनाचा मुख्य उद्देश

  • ग्रामीण घरांना स्वस्त, स्वच्छ आणि धूररहित इंधन उपलब्ध करणे

  • जनावरांच्या शेणाचा प्रभावी वापर

  • सेंद्रिय खत निर्मिती वाढवणे

  • रासायनिक खतावरील अवलंबित्व कमी करणे

  • महिलांचे श्रम कमी करणे (लाकूड/इतर इंधन गोळा करण्याची गरज कमी)

  • पर्यावरण संरक्षण आणि कार्बन उत्सर्जन कमी करणे

  • ग्रामस्वच्छता व आरोग्य सुधारणा




३) योजनेअंतर्गत मिळणारे लाभ

  • बायोगॅस प्लांट उभारणीसाठी सरकारी अनुदान (क्षमता 1m³ ते 6m³)

  • प्लांट स्थापनेबाबत पूर्ण तांत्रिक मार्गदर्शन

  • लाभार्थी व ग्रामस्तरावरील तांत्रिक कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण

  • स्लरी प्रक्रिया युनिटची माहिती व मार्गदर्शन

  • प्लांटची तपासणी, मान्यता व अनुदान वितरण पंचायत समितीद्वारे




४) बायोगॅस प्लांटचे प्रकार

  • घराबाहेरील स्थिर गुमटी प्रकार (Fixed Dome Type)

  • फ्लोटिंग ड्रम प्रकार (Floating Drum Type)

  • 1 ते 6 घनमीटर क्षमतेचे प्लांट



५) पात्रता

  • ग्रामीण भागातील कुठलाही कुटुंब/शेतकरी

  • किमान 2–3 जनावरे (गाई/म्हशी) → रोजचे 25–30 किलो शेण उपलब्ध असणे

  • प्लांट बसविण्यासाठी जागा असणे आवश्यक

  • घर/शेताची मालकी कागदपत्रे असणे